कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल)चा कोकण रेल्वेसोबत करार

नवी दिल्ली : कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने करार केला आहे. त्यानुसार सीआयएल आणि त्यांच्या उपकंपन्यांसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. देशातील एकूण कोळसा उत्पादनात ८० टक्के वाटा सीआयएलचा आहे.

कोळसा वाहतूक वेगवान व्हावी, यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे महत्त्वाचे आहे. कोल इंडिया लिमिटेड आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी १८ ऑगस्ट रोजी सीआयएल आणि त्यांच्या उपकंपन्यांच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या उद्देशाने एक गैरबंधनकारक सामंजस्य करार केला आहे, असे कंपनीने बीएसई फायलिंगमध्ये म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सीआयएलने ७८.११ कोटी टन कोळसा उत्पादन केले आहे. कंपनीच्या वार्षिक उद्दिष्टापेक्षा सात टक्के कोळसा उत्पादन कमी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 20/Aug/2025

Mahrashi karve ANM