रत्नागिरी : चिपळूणमध्ये बुधवारी, दि. २० ऑगस्ट रोजी होणार असलेला ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रद्द करण्यात आला आहे.
चिपळूण नगरपालिकेतर्फे सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी यांच्या सहकार्याने प्लास्टिकमुक्तीसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा पार पडली होती.
स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, अभिनेत्री वनिता खरात व अभिनेते ओंकार भोजने उपस्थितीत होणार होता. मात्र पावसाने निर्माण झालेली परिस्थिती तसेच हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खेळ पैठणीचा कार्यक्रम पुन्हा कधी होईल, हे दोन दिवसांनी जाहीर करण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी ही नोंद घ्यावी, असे आवाहन चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 20-08-2025












