रत्नागिरी : बंद शाळेच्या मागील बाजूस दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी : शहरातील पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपयांची चार लिटर दारू जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाझीम अहमद झारी (वय ६५, रा. जामा मशिदजवळ, झारणीरोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास आरसीचर्च रस्त्यावर पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस निदर्शनास आली. या प्रकरणी प्रमोद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 20/Aug/2025

Cake of the day