चिपळूण : किराणा दुकानाच्या फुटलेल्या पत्र्यातून आत शिरुन चोरट्याने चक्क काजूगर आणि बदामावर डल्ला मारल्याची घटना तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेत घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सावर्डे अडरेकर मोहल्ला येथील आदिल जावेद डोसानी यांनी याबाबतची तक्रार सावर्डे पोलिस स्थानकात दाखल केली आहे.
१७ ऑगस्टची रात्री ते १८ ऑगस्टची सकाळ यादरम्यान आदिल ट्रेडर्स या दुकानात शिरुन चोरट्याने १५०० रुपयांचे तीन किलो काजूगर आणि ३ हजार रुपयांचे ५ किलो बदाम चोरुन नेले आहेत. फुटलेल्या पत्र्यातून चोरटा आत शिरला असल्याचा अंदाज आहे. सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 20/Aug/2025












