चिपळूण तालुक्याची उर्दू शिक्षण परिषद उत्साहात

चिपळूण : चिपळूण तालुक्याची उर्दू शिक्षण परिषद एम. एच. परकार प्राथमिक शाळेत गट समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली झाली. कार्यक्रमाची सुरुवात कालुस्ते कन्या उर्दू शाळेचे शिक्षक अब्दुल कादिर तांबे यांच्या कुराण पठणाने झाली.

यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात हम्द आणि नआत गायन सादर केले. उपस्थित मार्गदर्शकांचे गट सहाय्यक शौकत कारविणकर यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अ. समद पटेल यांनी अध्ययन निष्पत्ती आधारित विद्यार्थ्यांची कार्यक्षमता पडताळणीचे सादरीकरण केले. मानसिक आरोग्य व स्वास्थ या विषयावर डॉ. जानवलकर यांनी मार्गदर्शन केले. कालुस्ते हायस्कूलचे ख्वाजा कडप्पा यांनी वीरगाथा या बाबत माहिती दिली.

उल्लास नवभारत साक्षरता मेळावा आयोजित करुन त्या अंतर्गत साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्देश ठेऊन साक्षरता दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन निलम दळवी यांनी केले.

दुसऱ्या सत्रात शाळेची यशोगाथा पिंपळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शराफत फकीर यांनी सादर केली. कान्हेतील शिक्षक शैलेश कुळे यांनी उत्तम इंग्रजी विषयाचे बळकटी करण्याबाबत अनेक शैक्षणिक साधनांद्वारे माहिती दिली. त्यानंतर गट समन्वयक अशफाक पाते यांनी जी. आर. वाचन केले. वाघिवरे हायस्कूलचे शिक्षक दानिश साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tata harrier

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 19/Oct/2024