रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या तालुका शाखेची सर्वसाधारण सभा तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या वेळी जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय क्षीरसागर, बँक ऑफ इंडियाच्या झोनल अधिकारी नाईक, महेंद्र ढाकणे आणि तालुका सचिव अवधूत शिंदे, कार्याध्यक्ष तुकाराम मुरकुटे, सुजित वाफेलकर, रामनाथ बने, पंकज शिंदे, अक्षता सायगावकर, मनोहर इनामे, रामदास चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा महिला आघाडीप्रमुख विभा बाणे यांचा सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 20/Aug/2025












