रत्नागिरी : शहरातील कर्ला येथे महिलेच्या डोक्यात लाकडी रिप मारुन दुखापत केली. याप्रकरणी एका महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास घडली. तमन्ना जमीर मजगावकर (रा. अलीमंझिल किस्मत कॉलनी कर्ला, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
तिच्या विरोधात समिना सउद मजगावकर (48, रा. किस्मतकॉलनी कर्ला, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित महिला ही फिर्यादी महिलेच्या घरी गेली. व तिने ‘हे घर माझे आहे, तुम्ही घरातून बाहेर जा, हे घर माझ्या नवऱ्याने बांधलेले आहे’ असे बोलून आरडा-ओरडा करत फिर्यादी महिलेच्या सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर फिर्यादी महिलेने तिला शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित महिलेने आपल्या हातातील लाकडी रीप फिर्यादी महिलेच्या डोक्यात डाव्या बाजुला मारुन दुखापत केली. तसेच तुला बघून घेते असे बोलून धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 20/Aug/2025












