रत्नागिरी (प्रतिनिधी) :
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत यशाचा झेंडा रोवला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १३ पदके जिंकत स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत पाली हायस्कूलच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत १० सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. या घवघवीत यशामुळे शाळेच्या १० खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ज्यामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विविध वजनी गटात मिळवलेले यश खालीलप्रमाणे:
१४ वर्षाआतील मुले:
कुमार अथर्व गराटे (इ. ८ वी क) – ५२ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार वरद धाडवे (इ. ८ वी क) – ५७ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार दक्ष कांबळे (इ. ८ वी ड) – ४८ किलो वजनी गट – द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) 🥈
१७ वर्षाआतील मुले:
कुमार मंथन कोकरे (इ. ९ वी अ) – ६५ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार धीरज नागले (इ. ११ वी) – ७१ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार युवराज रसाळ (इ. ९ वी अ) – ८० किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार दुर्वांक नागले (इ. ११ वी विज्ञान) – ११० किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार प्रथम पोवार (इ. ९ वी अ) – ६० किलो वजनी गट – द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) 🥈
कुमार प्रणव माईन (इ. ८ वी अ) – ४५ किलो वजनी गट – तृतीय क्रमांक (कांस्यपदक) 🥉
१९ वर्षाआतील मुले:
कुमार वेदांत नागले (इ. १२ वी) – ६१ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार यश कोत्रे (इ. ११ वी) – ७० किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार गौरव नागले (इ. ११ वी) – ७९ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
कुमार सोहम सावंतदेसाई (इ. १२ वी विज्ञान) – १२५ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) 🥇
या शानदार कामगिरीमुळे पाली हायस्कूलने आपला यशस्वी क्रीडा वारसा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १० खेळाडूंनी संस्थेचा लौकिक आणखी उंचावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 20-08-2025














