रत्नागिरीत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; नाखरेकरवाडी परिसरात पोलिसांची कारवाई, १९ लिटर दारू जप्त

रत्नागिरी शहर (प्रतिनिधी):

रत्नागिरी शहर पोलिसांनी नाखरेकरवाडी ते सनगरेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर नाखरेकरवाडी नदीकिनारी एका ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत १९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार अमिता संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नाखरेकरवाडी परिसरात अवैध दारू विक्री सुरू होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील सदाशिव जाधव (वय ५३, रा. मिरजोळे बौद्धवाडी, ता. रत्नागिरी) हा नाखरेकरवाडी नदीकिनारी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १९ लिटर गावठी दारू जप्त केली, ज्याची किंमत १९७५ रुपये आहे.

याप्रकरणी महिला पोलीस हवालदार अमिता पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील जाधव याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५१/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 20-08-2025