रत्नागिरी : जिल्ह्यात ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त 29 ते 31 ऑगस्टला क्रीडा स्पर्धा

रत्नागिरी : मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्ह्यात 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामिण भागातील नागरीकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविणे, निरोगी राहाण्याचे संदेश जावा, युवक व युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत.

शाळा, महाविद्यालये, नागरिक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, विविध प्रतिष्टान येथील कर्मचारी यांचेमध्ये सदर दिनाच्या निमित्ताने आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करुन निरोगी राहण्याचा मुलमंत्र देणे आवश्यक आहे. यासाठी विविध उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करुन मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, मॅराथॉन व दौड आयोजित करण्यात याव्यात. तसेच एकविध क्रीडा संघटना यांचे सहकार्याने प्रदर्शनीय सामने, क्रीडा विषयक चर्चासत्र, परिसंवाद आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यात 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांचे पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात येत आहे.

दि. 29 ऑगस्ट रोजी विविध संस्थांमध्ये सकाळच्या वेळत मेजर ध्यानचंद यांना श्रध्दांजली व फिट इंडिया प्रमिज्ञा आणि ६० मिनिटे सांघिक क्रीडा आणि मनोरंजनात्मक खेळ. दि. 30 ऑगस्ट रोजी शाळा/महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा वादविवाद, तंदुरुस्ती चर्चा, स्वदेशी खेळांभोवती क्रीडा स्पर्धा, घरातील खेळ. दि. 31 ऑगस्ट रोजी रविवारी फिट इंडिया सायकल रॅली चे आयोजन करणे.
वयोमनानुसार ओपन गटाने रस्सीखेच, योगा, शर्यत 50 मीटर रिले रन, मॅरेथॉन चमचा शर्यत, सॅक रेस, क्रिकेट, सायकलिंग, कबड्डी तर ज्येष्ठ नागरिक गटाने 300 मीटर स्पीड वॉक, 1 कि.मी. वॉक, योगा, सायकलिंग, श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 20/Aug/2025