चिपळुणात उद्या रानभाज्या महोत्सव

चिपळूण : तालुका कृषी अधिकारी चिपळूण, प्रकल्प संचालक आत्मा व अर्थ फाऊंडेशनतर्फे येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रानभाज्या महोत्सव, प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमदार भास्कर जाधव व आमदार शेखर निकम यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

या प्रदर्शनात २५ पेक्षा अधिक दुर्मिळ रानभाज्यांचे नमुने, औषधी उपयोग व पाककृतीबाबत मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 21/Aug/2025