संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगाव येथे एका विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जेसीबीच्या मदतीने या गव्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोंडगाव येथील सुरेश गांधी यांच्या शेतामध्ये १५ फूट खोल विहीर आहे. त्या विहिरीतील पाण्याचा वापर बोअरवेलच्या माध्यमातून केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सुरेश गांधी यांनी मंगळवारी (ता. १९) सकाळी विहिरीची पाहणी केली. तेव्हा त्यांना विहिरीच्या पाण्यात गवा तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 21/Aug/2025













