रत्नागिरी : पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे कोकणात दाणादाण उडाली. कोकण जलमय झाले. अतिवृष्टीमुळे तब्बल सहा नद्यांनी धोका, इशारा पातळी ओलांडून पुरपस्थितीनिर्माण झाल्यामुळे रत्नागिरी एसटी विभागाची एसटी वाहतूक ठप्प झाल्यामुळे ११३७ फेल्या रद्द केली असून ५२ हजार ८४६ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. एकुण मंगळवारी एका दिवशी तब्बल ३० लाखांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खेड, राजापूर, दापोली, चिपळूण, मंडणगड, संगमेश्वर यासह विविध तालुक्यात पावसाचा जोर असून याठिकाणच्या नद्यांनी धोका, इशारा पातळी ओलांडली असून एसटीसह विविध वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच तालुक्यातील चांदराई, हरचेरी, ओशी, बाग, आंजर्ला मार्गावरील वाहतूक बंद केली होती. वाढणाऱ्या पावसामुळे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सलग दोन दिवस शाळा, महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर करण्यात आली.
सुरक्षेसाठी एसटी विभागाच्या वतीने एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबई, गोवा महामार्गावरील वाहतूक चिपळूण, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद ठेवण्यात आली होती. पुणे मार्गावर वाहतूक सुरू आहे. तसेच कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात माती कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आंबा घाटासह, अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून यामार्गावरील फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांचे झाले हाल
संगमेश्वर, रत्नागिरी तालुका, दापोली, चिपळूण, मंडणगड या तालुक्यात राहणाऱ्या नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, सामान्य कामगारांचे मोठे हाल झाले. काहींना एसटी बसेसअभावी, वाहतूक सुरळीत नसल्यामुळे कामावर सुट्टी घ्यावी लागली, तर काहींनी खासगी गाड्या करून कामावर पोहोचले.
दुसऱ्या दिवशी वाहतूक थोडीसी पूर्ववत दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र सकाळपासून ते दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी दिसून आला. त्यामुळे काहीप्रमाणात एसटी गाड्या धावल्या. दुसऱ्यादिवशी साधारणतहा १६ हजार कि. मी. चा प्रवास रद्द झाला आहे. अंदाजे ५ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एसटी वाहतूक रद्द करण्यात आली. यामुळे एसटी विभागाचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 21/Aug/2025













