भोस्ते घाटात डंपरची ट्रकला धडक

खेड : मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपरने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरचे नुकसान झाले.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथून दगडी कोळसा घेऊन महाड येथे जाणाऱ्या डंपरने (एमएच ०६ बी डब्ल्यू ६८०६) त्याच्या पुढे असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक अजित कुमार (२३, रा. उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात डंपरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 21/Aug/2025