चिपळूण : ठाकरे गटाच्या शिवसेनेची बैठक शुक्रवारी (ता. २२) खेर्डी येथे होणार आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा ठाकरे गटाच्या शिवसेनेवर परिणाम होऊ नये यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. आमदार भास्कर जाधव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक खेर्डी जिल्हा परिषद गटापुरती मर्यादित असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या गटातून ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून खेर्डी येथील तेज हॉटेलच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता बैठक होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 22/Aug/2025













