गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर बाजारपेठ आज सुरू राहणार

संगमेश्वर : गणेशोत्सव पाच दिवसांवर आला असून, मोठ्या प्रमाणात मुंबईतील ग्रामस्थ गावी येत आहेत. त्यामुळे संगमेश्वर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे दर शुक्रवारी बंद राहणारी संगमेश्वर बाजारपेठ गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. २२) सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संगमेश्वर व्यापारीसंघाचे अध्यक्ष बापू भिंगार्डे यांनी दिली.

संगमेश्वर बाजारपेठ ही तालुक्यातील प्रमुख व मध्यवर्ती बाजारपेठ असून, आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिक येथे नियमितपणे खरेदीसाठी येतात. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी बाजारपेठ शुक्रवारीदेखील खुली ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे भिंगार्डे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 22/Aug/2025