चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक सुरू

चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूण-कराड मार्ग बंद होता. पाटण तालुक्यातील हेळवाक येथे कोयना नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कोयना धरणातून 95 हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत होते. परिणामी, हे पाणी नदीपात्राबाहेर येऊन हेळवाक या ठिकाणी रस्ता बंद झाला होता.

या पार्श्वभूमीवर चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा मोठा फटका एस.टी. वाहतुकीला बसला. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांची एस.टी. वाहतूक ठप्प होती. चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 22-08-2025

Samarth gold