चिपळूण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर मंदावला; मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक कमी झाली नसल्याने बुधवारी रात्रीपासून धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर ठेवले आहेत. सध्या सांडव्यावरून ९३ हजार ००, पायथा वीजगृहातून दोन हजार १०० असा एकूण ९५ हजार ३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तूर्तास धोका टळला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाने उघडीप घेतल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत काहीशी घट झाली. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १६८ (३९६१) मिलिमीटर, नवजाला २२३ (४८६६) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला २७६ (४५६१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जलाशयात प्रतिसेकंद एक लाख ११ हजार १६६ क्युसेक पाण्याची आवक होत असून, २४ तासांत ९.६० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 22-08-2025













