संगमेश्वर आयटीआयमध्ये ‘सोलर टेक्निशियन’ अभ्यासक्रम

रत्नागिरी : संगमेश्वर आयटीआय येथे सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.

पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित असल्याने आता अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, सौरऊर्जेचा वापर वेगाने वाढत आहे. सौरपॅनेल, सौरदिवे, सौरवॉटर हीटर, सौरचूल, सौरकंदील यांसारख्या सौर उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम निवडण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 22/Aug/2025