देवरूख : संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण येथे कासार कोळवण येथे २७ रोजी मनसेतर्फे टिपऱ्या आणि ३१ ला शक्ती तुऱ्याचा जंगी सामना रंगणार आहे. गावचे सुपुत्र विजय शंकर करंबेळे (प्रभाग संघटक मनसे, जोगेश्वरी विभाग) यांच्यातर्फे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात कोकणातील लोककला टिपरी नृत्य फुगडी व नाच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन ही कला जतन करून उन्नती वाढविण्याचे काम वडिलोपार्जित करत आले आहेत.
यावर्षी गणेशोत्सवामध्ये २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वा. साई कृपा टिपरी नृत्य कासार कोळवण, शाहीर गायिका पायल प्रशांत करंबेळे यांचा टिपरी नृत्य (फुगडी) कार्यक्रम सादरीकरण होणार आहे. नामांकित बुवा यांचा शक्तीतुरा जंगी सामना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ठीक ९ वा. मु. पो. कासार कोळवण (उगवती वाडी) कॅसेट शक्तिवाले शाहीर सचिन कदम वुवा खेड विरुद्ध तुरेवाले शाहीर श्री देवेंद्र झिमन बुवा लांजा. यांचा शक्ती-तुरा डब्बल वारी कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, मार्लेश्वर पंचक्रोशी पोलिस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष व राजकीय पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ सोहळाही होणार आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचक्रोशीतील तमाम रहिवासी यांना करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 22/Aug/2025













