चिपळूण : शहरातील शंकरवाडी येथील ६६ वर्षीय वृद्ध वसंत लोटेकर हे मंगळवारी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात बेपत्ता अशी नोंद करण्यात आली आहे. त्यांनी अंगात हाफ पॅन्ट व बनियन परिधान केली असून अद्याप ते घरी परतलेले नाहीत. तरी याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास चिपळूण पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 22/Aug/2025














