गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू ‘श्रीं’च्या मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम रविवार, दिनांक २४ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहेत.
यामध्ये रविवारी सकाळी ९:३० ते ११:३० ‘श्रीं’ची महापूजा व प्रसाद, तसेच २४ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ७:३० वाजता सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, दररोज सायंकाळी ७:३० ते रात्री ९:३० वाजता हभप वेदश्री वैभव ओक यांचे कीर्तन होणार आहे. २५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सहस्त्र मोदक समर्पण, २७ रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा होणार आहे. तसेच ४ रोजी वामन जयंतीनिमित्त सकाळी ११:३० ते २ यावेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांना भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे सरपंच व पंच कमिटी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 23/Aug/2025














