दापोलीत पावसामुळे लाखोंचे नुकसान

दापोली : तालुक्यात पावसाने नागरिकांच्या घरांचे, गोठ्याचे व जनावरांचे असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली तहसील कार्यालयामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झालेल्या नोंदी तहसील कार्यालयाच्या डायरीत नोंद होत आहेत.

बुधवारी दापोली तहसील कार्यालयाच्या नोंद वहीत सालदुरे येथील प्रकाश सखाराम आरेकर कच्च्या घराचे ४ हजार चारशे रुपये, पाजपंढरी येथील पोशिराम महादेव रघुवीर यांच्या कच्च्या घराचे ६० हजार रुपये, कुडावळे येथील अनिल रामचंद्र शेलार यांच्या कच्च्या घराचे १० हजार ५०० रुपये, माथेगुजर येथील नागचंद्र बाबू लोखंडे यांच्या गोठ्याचे ४ हजार ५०० रुपये, साकुर्डे येथील रुक्मिणी काशिराम जोशी यांच्या कच्च्या घराचे २५ हजार ४५० रुपये, वनोशी तर्फे नातू येथील अपर्णा अशोक चव्हाण यांच्या गाईचे वासरू विद्युत प्रवाहामुळे दगावून १० हजार रुपये, जिल्हा परिषद उर्दू शाळा पाजपंढरी शाळेचे ५० हजार रुपये असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 22/Aug/2025