हातखंबा येथे उतारात उभा केलेल्या ट्रेलरची दोन वाहनांना धडक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे उतारात उभा केलेला ट्रेलर अचानकपणे पुढे गेल्याने त्याची धडक बसून दोन वाहनांचे नुकसान झाले. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री १०.४० वा. घडली. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हरिद्वारी पाल (रा. रम्मुकापुरवा गयासपुर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

त्याच्याविरोधात पोलिस हेड कॉस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री राहुल पालने ट्रेलर (एमएच-४६-बीयु-२४७९) हा हातखंबा येथील ईश्वर ढाब्यासमोर उतारात उभा केला होता. परंतू ट्रेलर उभा करताना हॅन्डब्रेक किंवा चाकांना स्टॉपर लावला नव्हता. त्यामुळे ट्रेलर उतारा पुढे जाउन त्याची (एमएच-०८-बीई-४८६८) आणि (एमएच-०५-डीएस-८८९१) या दोन वाहनांना धडक बसून त्यांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 22/Aug/2025