गोळप-तोरस्करवाडीतील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. नरेश शंकर आंबेकर (५३, रा. गोळप-तोरस्करवाडी, रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ते घराजवळ काम करत असताना त्यांना अचानकपणे सर्पदंश झाला.

ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंबेकर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नरेश आंबेकर यांच्यावर तत्काळ उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 23/Aug/2025