चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा यावर्षी ७४ वा गणेशोत्सव साजरा होत आहे. ३ सप्टेंबर दुपारी ३ वा. माधव सभागृह, भोगाळे (चिपळूण) येथे एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत गट क्र. १ १ली ते ५वी, दुसऱ्या गटात ६ वी ते १० वी, गट क्र. ३ महाविद्यालयीन, खुला गट असे गट आहेत. शालेय गटासाठी तीन ते पाच मिनिटे व खुल्या गटासाठी ५ ते ७ मिनिटे असा वेळ सादरीकरणासाठी मिळेल. स्वालिखित किंवा नाटक, एकांकिका मधील उतारा सादरीकरणासाठी चालेल. वेशभूषा अत्यावश्यक नसून, भूमिकेची गरज बघून वेशभूषा केल्यास हरकत नाही. मात्र त्याला वेगळे गुण नाहीत.
ज्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी नावे अक्षर साहित्य प्रभंजन पिंपूटकर यांच्याकडे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भाऊ कार्ले (चिपळूण) यांच्याशी संपर्क साधावा. प्रथम तीन क्रमांकाना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रक प्रदान केले जाईल. प्रत्येक गटात किमान १० स्पर्धक अपेक्षित आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धेकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल व कार्याध्यक्ष रमण डांगे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 23/Aug/2025














