संगमेश्वर : कोसुंब ग्रामस्थांनी भरले रस्त्यावरील खड्डे

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील नजिकच्या ग्रामपंचायत कोसुंबमधील अंतर्गत फुगीचीवाडी ते फेपडेवाडी या रस्त्यावरील खड्डे फेपडेवाडीतील श्री देवी पडळकरीन मित्र मंडळातील ग्रामस्थांनी जांभा दगडाचे डबर वापरून भरले तसेच फुगीचीवाडी ते फेपडेवाडी ते रेवाळेवाडी या रस्त्याच्या बाजूस असणारी झाडी व गवत सफाई ग्रामस्थांनी श्रमदान करून केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील नजिकच्या कोसुंब गावातील अंतर्गत फुगीचीवाडी ते फेपडेवाडी या रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खडडयांमुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना खुपच त्रास सहन करावा लागत होता, यामुळे फेपडेवाडीतील ग्रामस्थांनी स्वखर्चाने जांभ्या दगडाचे डबर आणून श्रमदान करून खड्डे भरण्याचे सामाजिक काम नुकतेच केले. याचबरोबर फुगीचीवाडी ते फेपडेवाडी ते रेवाळेवाडी याच रस्त्याच्या बाजूस झाडी वाढली होती व गवत वाढले असल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेवून फेपडेवाडीतील महिलावर्गासह ग्रामस्थांमार्फत रस्त्याच्या बाजूस असणारी झाडी व गवत साफ करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

हे श्रमदान गणपती आगमनापूर्वी केल्यामुळे रस्ता व्यवस्थित झाल्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी आणि ग्रामस्थांनी समाधन आणि आनंद व्यक्त केला आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी लागणारे जांभ्या दगडाचे डबर खरेदी करण्यासाठी व रस्ता सफाई करण्यासाठी श्री देवी पडळकरीन मित्र मंडळातील सदस्यांनी आर्थिक सहाय्य उभे करून वाडीतील महिला आणि पुरुष या ग्रामस्थांनी श्रमदान करण्याचे परिश्रम घेतले तर या श्रमदानाचे नियोजन मंडळातील सर्व सदस्यांनी केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 23/Aug/2025