रत्नागिरी : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेदांत महाडिक, तिर्था निंबाळकर प्रथम

राजापूर : कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेदांत महाडिक व तिर्धा निंबाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महादेव धुरे, संजय सावंत यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर म्हणाले, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी आई आधार केंद्रामार्फत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.

जिल्हास्तरीय स्पर्धेत लहान गट (इ. ५ वी ते ७ वी) व मोठा गट (इ. ८ वी ते १० वी) असे दोन गट होते. जिल्हाभरातून ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात लहान गट वेदांत महाडिक (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेडीं-चिंचखरी), स्वराज कदम (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), ओजस्वी कोळपे (कै. मीनाताई ठाकरे विद्यामंदिर,
साडवली, देवरूख) यांनी, तर मोठ्या गटात तिर्था निंबाळकर (कै. मीनाताई ठाकरे विद्यामंदिर, साडवली, देवरूख), स्वरांगी जोशी (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), इच्छा कदम (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेडी) यांनी यश मिळवले.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह अॅड. गुरूदत्त खानविलकर, संजय सावंत, महादेव धुरे, नारायण शेलार, संचालक नामदेव तुळसणकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 23/Aug/2025

Dr amey pathak