रत्नागिरी : रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उद्घाटन २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोहमार्ग पोलिस दलाचे पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस कमिश्नर मुंबई एम. राकेश कलासागर, रेल्वे चिफ ऑफिसर संतोष कुमार झा यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला मुंबई लोहमार्ग पोलिस उपायुक्त प्रज्ञा झेडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त निलिमा कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रतिक तडवीही उपस्थित रहाणार आहेत.
या लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे मुंबई ते राजापूर लोहमार्ग पोलिस ठण्याची हद्द वाढली आहे. तसेच कोलाड ते राजापूर अशी रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याची हद्द वाढली आहे. या लोहमार्ग पोलिस ठाण्यात ६० अधिकारी, अंमलदार असणार असून १८० होमगार्ड देण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 25/Aug/2025














