महिलेशी जवळीक साधून शारीरिक शोषण प्रकरणी आरोपीवर कारवाई

रत्नागिरी : महिलेशी जवळीक साधून शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली. अजमेर वारभुय्या असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी आणि पिडीत महिला मुळच्या आसामच्या असून दोघेही कोकणनगर येथे वास्तव्याला आहेत. आरोपी आणि पिडीत महिला आसाम राज्यातील असून एकमेकांचे परिचित होते. यातून जवळीक वाढत गेली. काही मुद्यांवरून दोघांचेही वाद होत होते. दोघांकडूनही पोलिसांकडे तक्रारी केल्या जात होत्या. शनिवारी (ता. २३) पीडित महिलेने आरोपीविरुद्ध शहर पोलिसांकडे तक्रार केली. फेब्रुवारी ते जून महिन्यामध्ये आरोपीने आपण जीवाचे बरे-वाईट करून घेवू, तसेच महिलेच्या मुलांचे बरे-वाईट करू, असे सांगून वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला.

शनिवारी दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तासाभरातच अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांतर्फे अॅड. लांजन नाचणकर यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 25/Aug/2025