खेड : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर, हॉटेल चालकावर गुन्हा

खेड : घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याप्रकरणी खेड पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. खेड बसस्थानकाजवळील हॉटेल आशापुरा येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे २१ हजार रुपये किमतीचे सात गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार २६ जुलै रोजी सकाळी ११.५५ वाजता खेड तहसील कार्यालयातील अधिकारी अमोल देशमुख यांनी पंचांसह तपासणी केली असता, हॉटेलचालक आदाराम असलाजी रायका हा घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यावसायिक वापर करत असल्याचे आढळले. यावेळी पाच भरलेले व दोन रिकामे असे एकूण ७ सिलिंडर जप्त करण्यात आले. यामध्ये एचपी गॅसचे तीन व भारत गॅसचे चार सिलिंडर होते. ही कारवाई एलपीजी गॅस नियंत्रण आदेश २००० मधील कलम ३ चे उल्लंघन मानले गेले असून, असा घरगुती गॅसचा वापर करणे हे नियमांचे उल्लंघन आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 25/Aug/2025