गुहागर-विजापूर मार्गावरील खड्डे तत्काळ भरा; राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना तहसीलदार यांचे आदेश

गुहागर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने चाकरमान्यांसाठीची एसटी बस व्यवस्था व पार्किंग आधी महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेत गुहागर विश्रामगृहपासून दीड किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे येत्या तीन दिवसांत तातडीने बुजवण्याचे आदेश तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिले.

गुहागर विजापूर महामार्गावरील गुहागर शहरापासून विश्रामगृहापर्यंत दीड किलोमीटर रस्ता बहुतांशी खराब झाला आहे. तसेच शृंगातळी येथील पालपेने फाटा पुलाजवळील पडलेले मोठे खड्डे तातडीने भरण्यास सांगितले. मागील वर्षी गुहागरमधून चाकरमान्यांसाठी ३०८ एसटी फेऱ्या झाल्या होत्या, यावेळी ३१४ फेऱ्यांचे एसटी बुकिंग झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून अंदाजे ३५ ते ४० हजार चाकरमानी तालुक्यात दाखल होणार आहेत. अशावेळी येणाऱ्या एसटी बस गुहागर पोलीस परेड मैदान, पाटपन्हाळे व शृंगार तळी येथील पार्किंग व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.

अपघातास कारणीभूत ठरणारे मुख्य रस्त्यांवर वळणांवर लावलेले खाजगी जाहिरात फलक काढून टाकावेत अशा सूचना तहसीलदारांनी केल्या. शृंगारतळी बाजारपेठेत असलेली मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी होते. या गुरांना दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायत विशेष लक्ष द्यावे असे सुचवले. कोतळुक, वेळणेश्वर आदी ठिकाणचे धोकादायक झालेले साकव बंद करण्यात आले आहेत.

या साकवांवरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या. महावितरण कडून तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्टीवरून भूमिगत वायर टाकण्याचे काम चालू आहे. अशा स्थितीत नव्याने येणारी वाहने रस्त्याच्या बाजूला पासून अपघात होत आहेत. अशा ठिकाणी पट्टी टाकून हा भाग बंद करावा अशा सूचना करत पाऊस नसतानाही दिवसातून दहा ते पंधरा वेळा वारंवार होणारा खंडित होणारा वीज पुरवठ्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे अशा शब्दांत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी सुनावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 25/Aug/2025