पोसरे-बुद्रुकवाडीतील वृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू

खेड : तालुक्यातील पोसरे-बुद्रुकवाडी येथील वृद्धा मालती नारायण पालांडे (वय ७५) यांना १८ ऑगस्टला दुपारी सर्पदंश झाला होता. त्यांना प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. नंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून १८ ऑगस्टला रात्री त्यांना मृत घोषित केले. येथील पोलिसांनी २२ ऑगस्टला दुपारी आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 25/Aug/2025