महागणेशोत्सवामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा : मंत्री आशिष शेलार

मुंबई : “सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांनी तसेच दिव्यांगांना याद्वारे घरबसल्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपला सहभाग नोंदवावा,” असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

‘आला रे आला… राज्य महोत्सव आला’ हे गीत आणि ganeshotsav. राष्ट्र pldmka.co.in या पोर्टलचे लोकार्पण त्यांच्या हस्ते वांद्र्यात एमएसआरडीसी येथे करण्यात आले. शेलार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा तालुकास्तरापर्यंत घेतली जात असून विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांच्या रकमांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला साडेसात लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यास ५९ हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध केली आहे.

खुल्या गटातून महसूल विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर रील बनविण्याची स्पर्धा होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर व्याख्यानमाला, अध्यात्मक नाट्यरंग महोत्सव, ड्रोन शो, टपाल तिकिटे, चौकांचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 25/Aug/2025