गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरानजीकच्या गद्रे कंपनीजवळ गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सायंकाही ७.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणनंदकुमार चंद्रकांत मयेकर (५७, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा बेकायदेशिरपणे २ हजार २२० रुपयांची २५ लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 25/Aug/2025