खेड : भरणेतील मध्यवर्ती ठिकाणाजवळील अरुंद वळण आता अपघाताचे हॉटस्पॉट बनले आहे. पावसाळ्यापूर्वी बुजवलेला भाग उखडला असून, मोठा खड्डा पडला आहे. वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत धरून या मार्गाने जात आहेत. या ठिकाणी प्रवासीथांबाही असल्याने धोका अधिकच वाढला आहे. वाहने वळण घेताना या खड्ड्यातील पाणी थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडते. त्याचा त्रास पादचारी व महिला-विद्यार्थ्यांना होत आहे. संबंधित यंत्रणा याकडे कानाडोळा करत आहे.
रस्ता डागडुजीची कामे केवळ कागदावर दाखवली जातात. प्रशासनाने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:21 PM 30-Aug-25














