Maharashtra Dam Water Level Update: राज्यातील धरणांत ७१ टक्के पाणीसाठा !

९२९ धरणांमध्ये केवळ ४८ टक्के पाणी

सोलापूर:

Maharashtra Dam Water Level Update बाबत प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, यंदा अल निनोच्या संकटामुळे भीषण टंचाई निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरमांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या राज्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण ७१.३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असला, तरी मराठवाडा, अमरावती आणि नागपूर या विभागांमध्ये पाण्याचे संकट अद्याप कायम आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले असून राज्यातील ३०२९ धरणांचा आढावा घेतला असता, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २८,९७१ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा तर एकूण ३६,७४९.५३ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे धरण परिसरातील खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Dam Water Level Update: पुणे, कोकण व नाशिकला दिलासा, मराठवाड्यात चिंता
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा आणि असमान वितरण राज्यभरात पाहायला मिळत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कोकण, पुणे आणि नाशिक विभागाला मान्सूनने चांगलाच दिलासा दिला आहे.

विभागनिहाय धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

कोकण विभाग: विभागातील १७४ धरणांमध्ये ३३७०.८२ दलघमी म्हणजेच ८६.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पुणे विभाग: विभागातील ७२४ धरणांमध्ये १६०२९.७३ दलघमी म्हणजेच ८४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

नाशिक विभाग: ५३९ धरणांमध्ये ५१८८.२९ दलघमी म्हणजेच ७३.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

दुसऱ्या बाजूला मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये मराठवाड्यात जोरदार पाऊस होऊन अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, यंदा ऑगस्टचा पहिला आठवडा संपला तरी मराठवाड्यात अवघा ४८.०४ टक्के म्हणजे ९२९ धरणांत ५२७६.५०० दलघमी इतकाच पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागात पाण्याची चिंता कायम असून उर्वरित सप्टेंबर अखेरपर्यंत दमदार पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 11-08-2026