रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील कोलते स्टॉप-चिरेखाण येथे तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्यात विनापरवाना हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४२० रुपयांची चार लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) रात्री पावणेदहाच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 01-Sep-2025














