Chiplun : तळसर येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

चिपळूण : मुंबईहून गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील तळसर कदमवाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. महेश विष्णू कदम (३५)असे या तरुणाचे नाव आहे.

तळसर कदमवाडी वस्तीलगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. तो आणि त्याचे आई वडील अंगणात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी वस्तीतील मुले हनुमान मंदिराजवळ होती. त्यातील काही मुलांनी महेशला बोलावले. पुढे ही मुले विहिरीत पोहण्यासाठी गेले. मात्र पोहताना महेशने दोन ते तीनवेळा पाण्यात उडी मारली. मात्र, त्यानंतर त्याला वर येता आले नाही.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनेने तळसर कदमवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:10 PM 01-Sep-2025