रत्नागिरी : आपल्या लाडक्या लालपरीचे अचूक ठिकाण कळण्यासाठी एसटी महामंडळाने लाईव्ह लोकेशन अॅप १५ ऑगस्टपासून सुरू होईल अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप लाईव्ह लोकेशन अॅप सुरू झाले नसून बंदच आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव, गौरी गणपती सणात आलेल्या चाकरमान्यांना व सामान्य प्रवाशांचा हिरमोड झाला असून जिल्हा अंतर्गत, जिल्हाबाहरे एसटी सध्या कुठे आहे, किती बेळात बसस्थानाकावर येईल, याचे लाईव्ह लोकेशन कळत नसल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आता ऑनलाईनवर भर देण्यात येत आहे. आरक्षण अॅपसह विविध बाबी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता प्रवाशांना बसचे वेळापत्रक, प्रत्यक्ष कुठल्या मार्गावर धावरत आहे, येणार का नाही, नादुरुस्त आहे यासह विविध माहिती अॅपद्वारे होणार आहे.
उन्हाळी सुट्टी, दिवाळी, गणेशोत्सव यासह गर्दीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस रस्त्यावर धावत असतात. एसटीलाही प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र, एसटी वेळेवर न आल्यास प्रवाशांना एसटीची बाट पाहावी लागत असे. त्यामुळे सध्या एसटी बसचे लोकेशन काय आहे, किती वेळात येणार यासह विविध माहिती अँपमार्फत कळणार होते. दि. १५ ऑगस्टपासून लोकेशन अॅप सुरू होणार होते अशी घोषणा केली होती मात्र ती डेडलाईन हुकली आहे. अद्याप अॅप सुरूच झाले नसून अॅप बंदच आहे. दसरा-दिवाळीपूर्वी या अॅपचे काम सुरू होईल का प्रवाशांमधून होत आहे.
लाईव्ह लोकेशन अॅपमुळे प्रवाशांना एसटीचे ठिकाण, वेळ कळणार आहे. तसेच विविध सुविधाही या अॅपमध्ये असणार आहे. लाईव्ह लोकेशन संदर्भातील तांत्रिक काम सुरू आहे. अॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात अॅप सुरू होईल. काही गाड्यांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:50 PM 01-Sep-2025














