Chiplun : कुजलेल्या अवस्थेत आढळला वृद्धेचा मुतदेह

चिपळूण : अलोरे येथे एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अलोरे देऊळवाडी येथे ३१ ऑगस्टला दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली.

याबाबत अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अलोरे-देऊळवाडी येथे सुमित्रा गणपत चव्हाण (वय ७०) या राहत असलेल्या घरात त्यांचा सावत्र मुलगा मोहन गणपत चव्हाण असे एकाच घरात पण विभक्त राहत होते. त्या सतत आजारी पडायच्या. २९ ऑगस्टनंतर त्यांना कोणी पाहिले नाही. ३१ ऑगस्टला नातेवाइकांनी त्यांची चौकशी केली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 02-Sep-2025