Rajapur Ganpati Decoration : खरवतेत नारळाच्या काथ्यातून सजावट

राजापूर : तालुक्यातील खरवते येथील महादेव चौगुले यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाची पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. यामध्ये महादेव चौगुले यांचे सुपुत्र सुनील आणि त्यांची कन्या श्रुती हिने नारळाच्या फळाचा खुबीने उपयोग करीत नारळाच्या प्रतिकृतीची सजावट केली आहे.

गणेशोत्सवामध्ये गणेशमुर्तीसोबतच भक्तगणांकडून केली जाणारी गणेशाची आरास वा सजावटही नावीन्यपूर्ण अन् लक्षवेधी असते. अशाच प्रकारची पर्यावरणपूरक सजावट तालुक्यातील खरवते येथील चौगुले कुटुंबीयांनी केली आहे. त्यामध्ये त्यांनी नारळ आणि नारळाचा काथ्या याचा खुबीने उपयोग केला आहे. नारळ सोसल्यानंतर त्याचा काथ्या कचरा म्हणून टाकून दिला जातो. त्याच्या सहाय्याने नारळाच्या प्रतिकृतीची त्यांनी आकर्षक आणि नावीन्यपूर्ण सजावट केली आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करावे असे संदेश चौगुले कुटुंबीयांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 02-Sep-2025