लांजा : गणपती सणासाठी गावी आलेल्या लांजा सनगरवाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ओमप्रकाश दगडू शेडे (६०, रा. कल्याण पूर्व ठाणे) असे वृद्धाचे नाव आहे.
ओमप्रकाश शेडे हे रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता लांजा येथे आले. सायंकाळी गणपतीची आरती केल्यानंतर रात्री १० वाजता जेवण आटोपून शेजारी राहणारे प्रकाश सादिकले यांच्या घरी झोपायला गेले होते. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ओमप्रकाश यांच्या छातीत दुखायला लागल्याने मुलगा अनिकेत याने नातेवाईकांच्या मदतीने त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान सकाळी ७:५० वाजता त्यांचे निधन झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 03-Sep-2025










