काळबादेवीतील प्रतिथयश ग्रामस्थ चंद्रकांत नार्वेकर यांचे निधन

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथील प्रतिथयश ग्रामस्थ चंद्रकांत बंडू नार्वेकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते ७७ वर्षांचे होते.

१५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. बसणी येथील जी एम शेट्ये हायस्कूल येथे त्यांनी अनेक वर्ष सेवा बजावली. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी समाजसेवेच्या अनेक कामात हिरीरीने सहभाग लावला होता. मागील काही दिवस ते प्रकृती अस्वस्थामुळे आजारी होते. मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलगे, सूना नातवंड, भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी २४ ऑक्टोबर रोजी काळबादेवी टेंबरेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 21-10-2024

Shiva optical