अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत रोहिणी पाटील यांना 2 रौप्य तर श्रावणी पवार यांना 3 कांस्य पदक

चिपळूण : छत्तीसगडमधील रायपूर येथे २७ वी अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. सदर वन क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर वनवृत्तांतर्गत रत्नागिरी (चिपळूण) वनरक्षक रोहिणी पाटील यांनी दोन रौप्य तर श्रावणी पवार यांनी तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे.

संपूर्ण देशभरातून २८ राज्यांतील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर वनवृत्तांतर्गत रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाचे प्रतिनिधित्व वनरक्षक श्रावणी पवार, रोहिणी पाटील यांनी केले.

यामध्ये श्रावणी पवार यांनी ४०० मी. चालणे क्रीडा प्रकारात एक कांस्यपदक, हार्डल्स प्रकारात १ कांस्यपदक मिळविले आहे. याचबरोबर रोहिणी पाटील यांनी १५०० मी. व ८०० मी धावण्याच्या प्रकारामध्ये २ रौप्य व ४ बाय ४१०० रीले स्पर्धेमध्ये एक कांस्यपदक पटकावले.

देशपातळीवर दोन्ही खेळाडूंनी पदके मिळवल्याने रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशा भावना विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी व्यक्त केल्या आहेत.

Samarth gold

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 21/Oct/2024