Mirjole, Ratnagiri : शेतकऱ्यांसाठी औजार प्रस्ताव सादरीकरणाची आज अंतिम तारीख

जाकादेवी : ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना पंचायत समिती सेस २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना ग्रास गटर, पॉवर विडर, भात झोडणी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी औजारांसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. याबाबतचा अधिकृत पत्रव्यवहार गटविकास अधिकारी, श्रेणी वर्ग – १, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. मिरजोळे ग्रामपंचायत कार्यालयाने कळविले आहे की, इच्छुक शेतकऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

प्रस्तावासाठी ७/१२ मुळ प्रत (अंतिम तीन महिन्यांतील) आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (IFSC कोडसह) फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) – मोबाईल नंबर ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. मिरजोळेचे सरपंच व सदस्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ही संधी वेळेत व पूर्ण कागदपत्रांसह घेऊन प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून आधुनिक औजारांची सुविधा मिळवता येईल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 12/Sep/2025