रत्नागिरी : भाजपा नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चातर्फे येत्या १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होईल.
शिबिराला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. तसेच रत्नागिरीतील रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 16-09-2025














