चिपळूण : पिंपळी येथील तरुणाकडून एक किलो गांजा जप्त

चिपळूण : पुण्याहून येथे गांजा आणून विक्री करणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तरुणाला पोलिसांनी रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६० हजार ६०० रुपयांचा एक किलो गांजा जप्त केला आहे. त्याला सोमवारी येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. रोहिदास बाबू पवार (२८, पिंपळी, चिपळूण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव रोहिदास पवार आहे. हा गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. पवार याने हा गांजा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील रस्त्याच्या ठिकाणी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला होता. रविवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी त्याची प्राथमिक चौकशी केली असता विक्रीसाठी आणलेला गांजा पुण्यातून मिळवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुण्यातून नेमका कोठून आणला असून त्याची चौकशी सुरू आहे. सोमवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास जाधव, पोलिस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, रोशन पवार, प्रमोद कदम, संकेत गुरव, महिला पोलिस किरण चव्हाण आदीच्या पथकाने केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 22/Oct/2024

Dr radhika