Sangmeshwar: आमडें बुद्रुक येथे श्री गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पण

​◼️ ग्रामस्थांच्या मदतीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून घाटाची उभारणी; महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या हस्ते लोकार्पण

​संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आमडें बुद्रुक येथील तेलीवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून बांधण्यात आलेल्या श्री गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. भाजप महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून घाटाचे लोकार्पण करण्यात आले.

​यावेळी बोलताना सौ. ढेकणे यांनी, रवींद्र चव्हाण हे नेहमीच जनतेच्या गरजा समजून घेऊन काम करतात असे सांगितले. ग्रामस्थांची जुनी मागणी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या स्वनिधीतून हा घाट बांधण्यास हातभार लावला. हे काम भाजपच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

​या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ. नुपुरा मुळ्ये, मंडल अध्यक्ष श्री. प्रतीक देसाई, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा सौ. प्रियल जोशी, मध्य मंडळ सरचिटणीस श्री. राजेश आंबेकर, जिल्हा सचिव (महिला मोर्चा) सौ. सरिता आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Radhakrushna patapedhi

​कार्यक्रमाच्या शेवटी, ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण आणि भाजप नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भाजप कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच अशा उपक्रमांना यश मिळते,” असे वक्त्यांनी यावेळी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 27-09-2025