Ratnagiri : रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई ते रत्नागिरी रस्त्याने जाणाऱ्या उमरे फाटा आणि देवूड चाटवळवाडी या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ ते सायंकाळी ७.४५ वा. सुमारास करण्यात आली. मयुर प्रकाश शिंदे (वय ३४, रा. चांदेराई डोंगरवाडी, रत्नागिरी) आणि दिवाकर दत्तात्रय शेवडे (७०, रा. देवुड चाटवळवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

त्यांच्या विरोधात पोलिस हेडकॉस्टेबल रुपेश भिसे आणि पोलिस हवालदार रोशन सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी संशयित हे उमरे फाटा आणि देवूड चाटवळवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 29/Sep/2025

Kohinoor furni.1